जैविक कीटकनशके, बुरशीनाशके आणि त्यांचा वापर !!
फायद्याचे मायक्रो ओर्गेनिजम*
*1.ट्रायकोडर्मा* : -
एक बुरशी जी इतर बुरशीना खाते. *उपयोग*:- करपा , भुरी,डाऊनी,जमीनीतून येणाऱ्या बुरशींकरीता उत्तम .
*2.स्युडोमनास* : -
एक जिवाणू जो इतर बुरशीना खातो. *उपयोग*:- करपा,भुरी,डाऊनी,जमिनीतून येणाऱ्या बुरशींकरीता उत्तम.
*3.अँपिलोमयसिंन* :-
एक बुरशी जी इतर बुरशींना खाते. *उपयोग*:- करपा,भुरी सर्व पिकांवर येणाऱ्या बुरशींकरीता उत्तम.
*4.बॅसिलस सबटीलस* : -
एक जिवाणू जो इतर बुरशींना खातो. *उपयोग*:- करपा,डाऊनी,सर्व पिकांवर येणाऱ्या बुरशींकरिता उत्तम .
*5.बॅसिलस थ्यूरेणजेनेसीस* :-
हे अळी ने खाल्ले की तिला तोंडाचा पक्षवात होतो.तिचे खाने बंद होऊन 72 तासात मरते. बाजारात डायपेल-8,डेल्फिन,हाॅल्ड या नावाने उपलब्ध आहे.
*6.ब्युव्हेरिया ब्रासीना* : -
एक बुरशी जी रसशोषक किडींवर जगते आणि त्यांना मारते. *उपयोग*:- मावा,तुडतूडे ,मिलीबग करीता उत्तम.
*7.मेटारायझम अनिसपोली* : -
एक बुरशी जी अळीवर्गीय किडींवर जगते आणि त्यांना मारते. *उपयोग*:- सर्व प्रकारची अळी विशेष करून हुमणी अळी .
*8.वेस्टडीकम्पोजर* : -
तीन जिवाणू जे सडवण्याची प्रक्रिया वेगात करतात, बहुउपयोगी आहे .
*9.रायझोबियम*: -हे जिवाणू द्विदलवर्गिय कडधान्ये,तेलबिया यांच्या मुळींवर गाठी करून राहतात व हवेतील नायट्रोजन पिकांना उपलब्ध करून देतात.
*10.अझोटोबॅक्टर व अँझोस्प्रिलम*:- हे जिवाणू एकदल पिकांच्या मुळींजवळ राहून हवेतील नायट्रोजन पिकांना उपलब्ध करून देतात.
*11.PSB*: - हे जिवाणू जमिनीतील स्फुरद पिकांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगात करतात.
*12.KSB*: - हे जिवाणू जमिनीतील पालाश पिकांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगात करतात